• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुलावर अभिमान आहे असे म्हणत खासदार पिता प्रकाश वाजे भावुक…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

नाशिक प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे. पक्षातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भूमिकेची राज्यभर चर्चा होत असून, एका भावनिक क्षणामुळेही ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी वाट धरल्याची चर्चा सुरू असताना, या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षावरील विश्वास कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फुटीच्या वादळातही पक्षनिष्ठा जपणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

नाशिकमधून प्रथमच लोकसभेत पोहोचलेल्या राजाभाऊ वाजे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची वेगळी छाप निर्माण केली आहे. कांदा, द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, सिंहस्थ मेळा २०२७, गोदावरी नदी प्रदूषण, विमानसेवा आणि लॉजिस्टिक यांसारखे महत्त्वाचे विषय त्यांनी संसदेत प्रभावीपणे मांडले असून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, “मी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. भविष्यातही ठाकरे आणि पक्षासोबतच कायम राहणार आहे. माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. इतर सहकारी खासदारांबाबत मला काहीही माहिती नाही.”

राजाभाऊ वाजे यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर त्यांच्या वडिलांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या उद्धव साहेबांनी माझ्या मुलावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. मुलाने पक्षनिष्ठा जपली याचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत प्रकाश वाजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजकीय घडामोडींमध्ये सातत्याने बदल होत असताना राजाभाऊ वाजे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नाशिकच्या राजकीय वर्तुळातही या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे.

Previous Post

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशास सुरुवात

Next Post

परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — आमदार बबनराव लोणीकर

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — आमदार बबनराव लोणीकर

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In