• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात 100 वर्षे जुन्या शिसम लाकडाच्या भव्य रासखांबाची प्रतिष्ठापना; धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी)

शहरातील गुर्जर गल्ली, गांधी चौक परिसरात ग्रामदैवत स्वरूप भव्य रासखांब प्रतिष्ठापना व श्री राधाकृष्ण पूजन सोहळा अत्यंत धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. परिसराच्या सुख, समृद्धी, शांतता आणि आरोग्यासाठी हा सोहळा गुर्जर समाजातील 180 कुटुंबे व पटेल रास मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात फिरता रासखांब असल्याने त्याला निश्चित जागा नव्हती. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी हलवावा लागत असे. ही अडचण दूर करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन गांधी चौकात रासखांबासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित केली व मजबूत चौथरा उभारण्यात आला. अखेर आज विधीवत पूजन करून या ठिकाणी रासखांबाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

हा रासखांब खानदेशातील अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींपैकी एक मानला जात आहे. या रासखांबासाठी 100 वर्षे जुने शिसम लाकूड वापरण्यात आले असून, त्याची उंची सुमारे 12 फूट आहे. तब्बल साडेपाच टन वजनाचा अखंड दगड पाया म्हणून वापरून साडेपाच फूट उंच चौथरा तयार करण्यात आला आहे.

खांबाच्या तळभागी सर्व दिशांना मुख असलेले आठ अश्व कोरण्यात आले आहेत. तसेच वरच्या भागात श्री राधाकृष्णाच्या चार-चार सुंदर कोरीव कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. खांबावर दिव्यांची सोय असून, शिखरावर रथाचे चाक आणि भगवा झेंडा आकर्षण ठरत आहे. या प्रकारचे अष्टमुखी अश्व कोरीव काम संपूर्ण खानदेशात दुर्मिळ असल्याचे मानले जाते.

बुधवारी पहाटेपासूनच पाच पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधी सुरू झाले. सुमारे तीन तास चाललेल्या मुख्य पूजनानंतर सत्यनारायण कथेचे वाचन व महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या ठिकाणी दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा व कार्तिकी त्रिपुरी पौर्णिमेला महिलांकडून विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

या प्रसंगी माजी नगरसेवक सुभाष पाटील, किशोर पाटील, सतीश पाटील, हिरालाल पाटील, सुरेश चौधरी, नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक राकेश पाटील, धनराज पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य जे.डी. पाटील, प्रदीप पटेल यांच्यासह अनेक समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या ऐतिहासिक आणि धार्मिक उपक्रमामुळे शहादा शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

शहादा येथे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

Next Post

शहाद्यात वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; पुस्तक वाटप व पर्यावरण प्रतिज्ञेने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

शहाद्यात वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; पुस्तक वाटप व पर्यावरण प्रतिज्ञेने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In