• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्यात श्री सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना डॉक्टरेट बहाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

सांगली – तासगाव प्रतिनिधी :
श्री शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्व तसेच वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे श्री सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि लोकहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला आहे. वंचित समाजघटकांचे हक्क, महिला शोषण, हुंडाबळी, हुंडा छळ, बालमजुरी, बालविवाह, जातीभेद, जातीय हिंसाचार, बेकायदेशीर कृत्ये, भ्रष्टाचार, तसेच मूलभूत अधिकारांचे उल्लंघन अशा अनेक गंभीर सामाजिक समस्यांवर त्यांनी सक्रियपणे काम केले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पोलीस यंत्रणेकडून होणारी कथित मनमानी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत केसेसचे निराकरण, सरकारी जागेवरील अतिक्रमणांचे नियमितीकरण, वनजमिनीवरील दलित वसाहतींचा प्रश्न, तसेच “डि-फॉरेस्टेशन (Disforest) मोहीम” राबवून भूमिहीन व बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

त्याचबरोबर भूमिहीन व बेघर नागरिकांना सरकारी जमीन उपलब्ध करून देणे, त्यावर घरकुल मिळवून देणे, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभावी लाभ मिळवून देणे, तसेच दलित वस्ती विकास आराखडा समाजकल्याण विभागामार्फत राबवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

“वस्ती जिथे अंगणवाडी तिथे” हा पॅटर्न दलित वस्त्यांमध्ये राबविणे, वाड्या-वस्त्यांमध्ये वीजपुरवठा, रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, लाईट व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच सबळीकरण योजनेअंतर्गत भूमिहीनांना शासकीय जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे.

समाजजागृतीसाठी समाजमंदिरे, संविधान सभागृहे, सभामंडप उभारणी, तसेच रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उभारणे यावरही त्यांनी भर दिला आहे. सामाजिक उपक्रम व लोकहिताच्या योजना राबवून त्यांनी समाजातील जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे.

मानवाधिकार संघटना (MASSO) तसेच भारतीय प्रशासनिक जन सुधार शिकायत परिषद, दिल्ली या संस्थांच्या माध्यमातून ते दक्षता अधिकारी (नॅशनल कमिटी) म्हणून कार्यरत असून त्यांचे कार्य संपूर्ण भारतभर पोहोचले आहे.

या कार्याची दखल घेत अमेरिकास्थित ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीने दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी पुद्दुचेरी येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. या कार्यक्रमासाठी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते.

या सन्मानामुळे तासगाव (सांगली), जरंडी, खानापूर (विटा), करंजे, माहुली (आटपाडी), नेलकरंजी तसेच पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

शहाद्यात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजली समितीकडून भव्य योग शिबिराचे आयोजन

Next Post

स्वच्छ भारत अभियानाची खरी रखवाली; सेलूतील वृद्ध महिलेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

स्वच्छ भारत अभियानाची खरी रखवाली; सेलूतील वृद्ध महिलेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In