• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगाव जिल्ह्यातील खानदेशातील नामवंत कवी, लेखक स्व. एस. सी. जगदाने यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

व्हिजन फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी :

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील झाडी गावचे विचारवंत कवी, लेखक, साहित्यिक व गीतकार स्वर्गीय श्री. एस. सी. जगदाने (शेणफडू चिंधा जगदाने) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त व्हिजन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

स्व. कवी जगदाने यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी समाज प्रबोधनपर गीते, भावगीते, भक्तीगीते, लोकगीते तसेच हुंडाविरोधी गीते लिहून ग्रामीण भागात जनजागृती घडवून आणली. खेडेगावातील लग्नसमारंभांमध्ये हुंडाविरोधी विचार रुजवण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले.

ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच कामाच्या व्यस्ततेतून स्वतःसाठी वेळ काढून शिक्षण व प्रबोधनाकडे वळावे, यासाठी त्यांनी “रात्रीचा प्रौढवर्ग शिक्षक” म्हणूनही योगदान दिले.

समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी सातत्याने समाजकार्य केले असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी मानला जातो.

त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त चिरंजीव शिवलाल जगदाने यांनी व्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी भावनिक होत त्यांनी सांगितले की, “माझ्या वडिलांनी केलेल्या समाजकार्याची पोचपावती त्यांना आयुष्यभर मिळत गेली असून त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत.”

या कार्यक्रमामुळे परिसरात स्व. जगदाने यांच्या कार्याची आठवण जागृत झाली असून उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

Tags: Shivlal Jagdane
Previous Post

उन्हाच्या तडाख्याने भाजीपाला होरपळला; चांदवड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

Next Post

प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात..!

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post

प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात..!

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In