• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोखाड्यात ‘स्वराज हॉलीबॉल लीग 2026’चा उत्साहात समारोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

कोळध्याचापाडा संघ विजेता; ग्रामीण खेळाडूंच्या कौशल्याला मिळाले व्यासपीठ

मोखाडा:
दिगंत स्वराज फाउंडेशनच्या वतीने मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये हॉलीबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या वर्षभरापासून विविध गावपाड्यांमध्ये हॉलीबॉल प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रशिक्षण उपक्रमामध्ये काकडपाडा, कोळध्याचापाडा, वखारीचापाडा, पोशेरा आणि पवारपाडा येथील खेळाडूंनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाचा परिपाक म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज हॉलीबॉल लीग 2026’ चे सेमी फायनल आणि अंतिम सामने दिनांक 17 जून 2026 रोजी सीनियर कॉलेज, मोखाडा येथील मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

विशेष म्हणजे, स्पर्धेत मुलांच्या संघांसोबतच मुलींच्या दोन संघांनीही सहभाग घेतला. काकडपाडा मुली संघ आणि वखारीचापाडा मुली संघ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचे उद्घाटन सीनियर कॉलेज मोखाडा येथील प्राध्यापक दत्तात्रय भोये, दैनिक पुढारीचे पत्रकार हनीफभाई शेख तसेच पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या रोमांचक सामन्यात कोळध्याचापाडा संघाने विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांक मिळविला, तर काकडपाडा संघाने उपविजेतेपदावर समाधान मानले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, शिस्त आणि सांघिक खेळ हे प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले.

समारोप कार्यक्रमात दिगंत स्वराज फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे, दानिश शेख तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विजेते आणि सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र, मेडल आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारा दिगंत स्वराज फाउंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या स्पर्धेमुळे तालुक्यातील अनेक नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली असून, मोखाडा तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Tags: Tejas Rokde
Previous Post

प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात..!

Next Post

तोहीद खान हत्या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post

तोहीद खान हत्या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In