• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्हेरवाडी येथील सचिन चोरे खून प्रकरण; तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

कळवण : तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून झालेल्या सचिन चोरे यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना कळवण न्यायालयाने २० जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृत सचिन चोरे यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून सचिन चोरे यांचा खून झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी योगेश बागुल, प्रकाश बागुल आणि संदीप पवार यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. १५ जून रोजी आरोपींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपींना सुरक्षितस्थळी हलविले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना देवळा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

मृत सचिन चोरे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कळवण पोलीस ठाण्यातही नातेवाईकांनी उपस्थित राहत संताप व्यक्त केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढत तपास निष्पक्षपणे सुरू असल्याचे सांगितले.

१६ जून रोजी दुपारी तिन्ही आरोपींना कळवण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलेल्या युक्तिवादात खून प्रकरणातील विविध पैलूंची चौकशी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आरोपींच्या मोबाईलमधील संवाद, व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील पुरावे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या साहित्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगण्यात आले.

न्यायालयाने पोलिसांची मागणी ग्राह्य धरत तिन्ही आरोपींना २० जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या कालावधीत आरोपींची कसून चौकशी करून खुनामागील नेमके कारण, कटातील सहभाग आणि इतर संबंधित बाबींचा तपास केला जाणार आहे.

कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोंद्रे देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश शेवाळे, संदीप बहिरम, पोपट महाले, पंकज शेवाळे व पुंडलिक डबळे हे पुढील तपास करीत आहेत.

या खून प्रकरणामुळे कन्हेरवाडीसह संपूर्ण कळवण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Previous Post

विधान परिषद निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्री बंद

Next Post

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

"स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका" — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In