• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

औराळा येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी तसेच स्मार्ट मीटरविरोधात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी विविध शासकीय विभागांना निवेदन देत शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

रासायनिक खतांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र खत विक्रेत्यांना ऑनलाइन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खत नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया तात्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.

महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांना संदेश पाठवले जात असून, जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नयेत, असा इशाराही यावेळी देण्यात आला. “स्मार्ट मीटर बसवायचे असतील तर नागपूरपासून सुरुवात करा, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका,” अशा शब्दांत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

याशिवाय मागील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी तसेच मागणी नसताना घरगुती विजेचे स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

हे निवेदन तालुका कृषी अधिकारी, पीकविमा कंपनी, छत्रपती संभाजीनगर तसेच कन्नड येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता राठोड साहेब यांना देण्यात आले.

यावेळी देवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरे साहेब, भिसे साहेब, पोलीस निरीक्षक सलीम शहा, कांबळे साहेब आणि बढेकर साहेब उपस्थित होते.

Previous Post

कन्हेरवाडी येथील सचिन चोरे खून प्रकरण; तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In