• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

नवी दिल्ली : येत्या २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ (यूजी) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पेपरफुटी आणि फसवणुकीच्या अफवांना आळा घालण्यासाठी २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांच्या शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९अ अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून हे निर्बंध लागू केले आहेत.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

एनटीएने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, गेल्या काही काळात टेलिग्रामद्वारे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या अफवा, बनावट प्रश्नपत्रिका आणि चुकीची माहिती पसरवली जात होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिशाभूल करून हजारो ते लाखो रुपये उकळण्याचे प्रकार समोर आले होते.

या संदर्भात एनटीए आणि विविध राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सविरोधात कारवाई केली होती. मात्र स्वतंत्रपणे चॅनेल्स बंद करूनही गैरप्रकार पूर्णपणे थांबत नसल्याने अखेर प्लॅटफॉर्म स्तरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

एनटीएने या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्बंधांचा काही प्रमाणात सर्वसामान्य वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो, याची कबुली संस्थेने दिली असली तरी परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, २१ जून २०२६ रोजी होणारी नीट पुनर्परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवा, बनावट संदेश किंवा अप्रमाणित माहितींकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

Next Post

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In