• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

नेर प्रतिनिधी

नेर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईमुळे नेर शहरासह तालुक्यातील पानटपरी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अनेक पानटपरी चालकांनी आपल्या टपऱ्यांचे शटर खाली करत व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यवतमाळ आणि दारव्हा परिसरात झालेल्या कारवाईनंतर नेर तालुक्यातील व्यवसायिक अधिक सतर्क झाले असून, नेमके कोणत्या वस्तू विक्रीस ठेवाव्यात आणि कोणत्या विकू नयेत याबाबत स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने व्यापारी संभ्रमात सापडले आहेत.

रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांवरील बंदी व त्यासंदर्भातील कठोर कारवाईची माहिती सर्वांनाच असली, तरी कोणत्या वस्तूंवर बंदी आहे आणि कोणत्या वस्तू कायदेशीररित्या विकता येतात, याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

काही व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “मोठ्या पुरवठादारांवर कारवाई न होता किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाईचा अधिक फटका बसत आहे.” त्यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाची मोहीम आवश्यक असल्याचे नागरिकांकडून मान्य करण्यात येत असले, तरी नियम आणि विक्रीस मान्य असलेल्या वस्तूंबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

व्यवसायिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, पानटपरी चालकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन शिबिरे घेऊन अधिकृत यादी जाहीर करावी, जेणेकरून गैरसमज टळतील आणि छोट्या व्यवसायिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही.

Previous Post

‘नीट’ परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल

Next Post

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In