• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, धार्मिक उपक्रम तसेच जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे लायन हार्ट ग्रुप, नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दर्पण गौरव संमेलनात हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

मुंबईतील मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आयकर विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुनील अगवणे, ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार, डॉ. अमजद खान पठाण, डॉ. पूर्णिमा सुर्वे, डॉ. जे. के. महाडिक, उत्तम तरकसे, सायली पावसकर, सलमा खान, एन. डी. खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विरेंद्र यशवंत म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, पर्यावरण संवर्धन मोहिमा, रक्तदान शिबिरे, जनजागृती अभियान तसेच समाजहिताच्या अनेक कार्यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शासकीय अनुदानाची अथवा वर्गणीची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खर्चातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

त्यांच्या या समर्पित आणि सातत्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे नवी मुंबईसह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विरेंद्र म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत समाजासाठी अशा कार्यकर्त्यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

‘कोकण दर्शन’मध्ये गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांचा विशेष वेध

Next Post

म्हाळसाकोरे परिसरातील पोस्टमन पुत्राची ‘सीए’ परीक्षेत उत्तुंग भरारी; अल्कबीर पठाण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
19
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

म्हाळसाकोरे परिसरातील पोस्टमन पुत्राची ‘सीए’ परीक्षेत उत्तुंग भरारी; अल्कबीर पठाण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In