• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

धारणी | दि. १६ जून २०२६

समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मेळघाटातील सुमारे २५० शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला (IAS), सहाय्यक वनसंरक्षक सुमित कुमार (IFS) आणि तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव उपस्थित होते. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. लांडे, डॉ. सचिन शिंदे, श्री. माने आणि डॉ. मते यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रगती सहयोगचे श्री. स्वामी डूरके यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी संस्थेच्या व कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या संयुक्त उपक्रमांचा आढावा घेतला. मागील रब्बी हंगामात २०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलो हरभरा बियाणे तसेच ३० कृषी पंपांचे वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, हा केवळ बीज वाटप कार्यक्रम नसून “बीज मदत कार्यक्रम” आहे. या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकरी भगिनींनी पुढील वर्षी स्वतःच्या उत्पादनातून काही बियाणे इतर गरजू शेतकरी महिलांना देऊन या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत १८५ शेतकऱ्यांना लाल तूर, तर ५० शेतकऱ्यांना सोयाबीन, राळा, कुटकी आणि नाचणी या पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. धारणी तालुक्यातील सुमारे ४५ गावांमधील १५० महिला आणि ५० पुरुष शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी बियाण्यांची प्रक्रिया, उगवणक्षमता आणि खरीप हंगामात घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, योग्य पावसाची प्रतीक्षा करूनच शेतीची कामे सुरू करावीत, असे आवाहन केले. तसेच धारणी येथे लवकरच एपीएमसी बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी मार्गदर्शन करताना मेळघाटातील कुपोषण, बालविवाह, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या विषयांवर भाष्य केले. कोरकू आदिवासी समाजाची पारंपरिक शेतीपद्धती जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. पोषणमूल्य असलेल्या पारंपरिक पिकांची लागवड वाढवून पोषण सुरक्षा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.

सहाय्यक वनसंरक्षक सुमित कुमार यांनी जंगल हे आदिवासी समाजाचे पारंपरिक संसाधन असल्याचे सांगत त्याचा शाश्वत वापर आणि संवर्धनासाठी ग्रामसभांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांनी “हमारा स्वास्थ्य हमारी जिम्मेदारी, कुपोषण मुक्त मेळघाट हमारी भागीदारी” अशी घोषणा देत कुपोषणमुक्त मेळघाट घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमास समाज प्रगती सहयोगचे कमलजी, सूरज, देवेंद्र, साक्षी, रामदास तसेच संस्थेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Previous Post

सावली बेघर निवारा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन’ साजरा

Next Post

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
18
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In