• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावली बेघर निवारा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन’ साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

परभणी | प्रतिनिधी :

परभणी शहर महानगरपालिकेच्या साखला प्लॉट येथील सावली बेघर निवारा केंद्रात “जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन” निमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर हक्क, संरक्षण, कल्याण, प्रतिष्ठा आणि न्यायप्राप्तीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश भूषण काळे प्रमुख उपस्थित होते. तसेच परभणी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, शहर व्यवस्थापक पठाण यखत्यारखान, DAY-NULM विभागाचे शेख महम्मद यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान न्यायाधीश भूषण काळे यांनी निवारा केंद्रातील लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कायदेविषयक अडचणी, न्यायालयीन प्रकरणे आणि विविध समस्यांबाबत माहिती घेतली. ज्येष्ठ नागरिकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत, कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणींसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर आवश्यक औषधोपचार व औषधांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी DAY-NULM टीम तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास ॲड. पांडुरंग शिंदे, प्रीतेश तरोडेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची टीम तसेच सावली प्रतिष्ठानचे संचालक युवराज गव्हाणे उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत आयुक्त नितीन नार्वेकर यांनी व्यक्त केले.

Previous Post

सौ. कुसुम कनकुटे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
16
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In