• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
93
VIEWS
Ad 1

विशेष पोर्टलवर मोफत नोंदणी, शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचविण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप समूहही सुरू होणार

शिरूर | प्रतिनिधी

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

दिव्यांग बांधवांना आर्थिक बळ देतानाच विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने शिरूर नगरपरिषदेच्या वतीने १४० दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे १३ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

नगर परिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील, बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिताताई पोटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार, सभापती स्वाती साठे, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, सागर नरवडे, रवींद्र ढोबळे तसेच नगरसेविका पूजा पोटावळे, सुनिता भुजबळ, संगीता मल्लाव, स्वीटी शिंदे, चारुशीला कोळपकर आणि रिंकू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांनी दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विशेष पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. या नोंदणीमुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, ही नोंदणी नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिव्यांग नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, सवलती, उपक्रम व महत्त्वपूर्ण सूचना तातडीने पोहोचाव्यात यासाठी शिरूर शहरातील दिव्यांग बांधवांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप समूह तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

दिव्यांग बांधवांच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय सक्षमीकरणासाठी शिरूर नगरपरिषद सातत्याने सकारात्मक पावले उचलत असून, १४० लाभार्थ्यांना निधी वितरणाबरोबरच माहिती व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सुरू केलेले हे प्रयत्न समाजाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण मानले जात आहेत.

Previous Post

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

Next Post

अमरावती जिल्ह्यातील सर्व सीबीएसई व राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासूनच सुरू होणार

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
19
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

अमरावती जिल्ह्यातील सर्व सीबीएसई व राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासूनच सुरू होणार

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In