• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

लातूर, दि. १८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशाला हरंगुळ खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने हरंगुळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्रशालेत ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन’ तसेच ‘मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा’ या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, गटशिक्षण अधिकारी चांद शेख, समग्र शिक्षा अभियान प्रमुख सतीश भापकर, शाळेच्या मुख्याध्यापिका राजकन्या गंभीरे, हरंगुळ खुर्दचे सरपंच मनोहर झुंजे पाटील, उपमुख्य न्यायरक्षक ॲड. जी. जे. मिटकरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम २१अ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम २३ हे शोषणाविरुद्धच्या हक्काशी संबंधित असून, कोणत्याही व्यक्तीकडून सक्तीने काम करून घेणे किंवा मानवी तस्करीस प्रतिबंध असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतातील ‘बाल कामगार प्रतिबंध कायदा १९८६’ अंतर्गत १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई असल्याचे सांगत, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बालमजुरीचे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा ‘चाइल्ड लाईन’च्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

Previous Post

वेदांत बंडागर खून प्रकरणात सांगली एलसीबीची मोठी कारवाई; ढालगावातील युवकास अटक

Next Post

‘नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

‘नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In