• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पोलीसांची धडक कारवाई; धारदार चॉपरसह मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि धारदार चॉपर बाळगणाऱ्या दोन आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत आरोपींकडून शस्त्रांसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

दि. १६ जून रोजी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना शहरातील जर्मन हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या फाट्याजवळ दोन संशयित इसम गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हंडाळ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदीप दरदंले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण आणि अशोक खाडे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता दोन संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या जुपिटर दुचाकीजवळ दगडावर बसलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे नाझीम अन्वर पठाण (वय २५, रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) आणि मोहम्मद जाफर खुदाबक्ष पटेल (वय १८, रा. काजी बाबा रोड, वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) अशी सांगितली.

झडतीदरम्यान नाझीम पठाण याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, सिल्व्हर-काळ्या रंगाचा बट असलेले मॅगझिन आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तर मोहम्मद जाफर पटेल याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, एक धारदार चॉपर आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३, ७, २५ (६) व २५ (७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

Next Post

श्रीरामपूरात भुयारी गटार योजनेचे २२ कोटी रुपये सरकारजमा

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
9
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

श्रीरामपूरात भुयारी गटार योजनेचे २२ कोटी रुपये सरकारजमा

ताज्या बातम्या

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026
दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In