• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

परभणी/प्रतिनिधी :-

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्क्रिय कारभारामुळे एका शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना मानवत तालुक्यातील मौजे लोहरा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मिळालेल्या माहितीनुसार, लोहरा येथील शेतकरी बाळासाहेब नारायणराव जाधव यांच्या शेताजवळील वीज पोल दि. ६ जून २०२६ रोजी झालेल्या वादळामुळे कोसळला होता. त्यासोबतच विद्युत तारा देखील जमिनीवर पडल्या होत्या. या धोकादायक परिस्थितीबाबत जाधव यांनी महावितरण प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून पोल उभारणे आणि तारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, दि. १८ जून रोजी शेतात पाळी सुरू असताना जाधव यांचा बैल खाली पडलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. जोरदार विद्युत धक्का बसल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पडलेल्या विजेच्या तारा, धोकादायक पोल आणि खराब विद्युत यंत्रणा त्वरित दुरुस्त करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous Post

परभणी-हिंगोली मतदारसंघात 99.79 टक्के मतदान; २२ जूनला कोण मारणार बाजी?

Next Post

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
8
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
14
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
6
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
4
Next Post

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In