• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरात भुयारी गटार योजनेचे २२ कोटी रुपये सरकारजमा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

१२ वर्षांनंतर योजना गुंडाळली; चौकशीची श्रीनिवास बिहाणी यांची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेली भुयारी गटार योजना अखेर तब्बल १२ वर्षांनंतर अपयशी ठरत गुंडाळण्यात आली असून, योजनेसाठी शिल्लक राहिलेले तब्बल २२ कोटी ७३ लाख रुपये शासनाकडे परत जमा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. या प्रकरणी योजनेच्या अपयशाची जबाबदारी निश्चित करून चौकशी समिती नेमण्याची मागणी भाजप नेते श्रीनिवास बिहाणी यांनी केली आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भुयारी गटार योजनेचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे यांनी योजनेचे उर्वरित निधी शासनाला परत करावे लागत असल्याची माहिती सभागृहात दिली.

मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले की, योजनेच्या खात्यावर सध्या २२ कोटी ७३ लाख रुपये शिल्लक असून त्यामध्ये पालिकेच्या १४ व्या वित्त आयोगातील निधीचाही समावेश आहे. या रकमेतील पालिकेचा हिस्सा परत मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते श्रीनिवास बिहाणी यांनी या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही काम पूर्ण झाले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या अपयशाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची व संबंधितांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासनाने विशेष समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.

सभेमध्ये भाजपचे आशिष धनवटे, संजय गांगड, शिवसेना (शिंदे गट)चे आकाश बेग, भाजपच्या स्नेहल खोरे, मंजुश्री मुरकुटे तसेच काँग्रेसचे मुजफ्फर शेख, राजेंद्र पवार आणि दिलीप नागरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

दरम्यान, शहरातील प्रस्तावित भाजी मंडईच्या विकासाचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. चार वर्षांपूर्वी भाजी मंडईच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतेही भरीव काम झाले नसल्याचे निदर्शनास आणून देत बिहाणी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Previous Post

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

Next Post

भावाच्या वादातून अखाड्याला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
9
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

भावाच्या वादातून अखाड्याला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

ताज्या बातम्या

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026
दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In