• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरेगावच्या जयदीप शिंदेचा MHT-CET परीक्षेत धमाका; पहिल्याच प्रयत्नात ९९.६४ पर्सेंटाईल गुण मिळवून तालुक्यात प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

नेवासा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) २०२६ (PCM ग्रुप) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथील जयदीप अनिल शिंदे याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. जयदीपने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ९९.६४ पर्सेंटाईल गुण मिळवून नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे सुरेगावसह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे जयदीपचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल आणि ग्रामीण परिस्थितीत झाले आहे. त्याचे इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण सुरेगाव (गंगा) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात झाले. ग्रामीण भागात मर्यादित शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतानाही त्याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर राज्य पातळीवरील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या परीक्षेत हे घवघवीत यश संपादन केले आहे.

RelatedPosts

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

जयदीपचे वडील अनिल साहेबराव शिंदे आणि आई अंजुषा शिंदे यांनी मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. कोणत्याही मोठ्या शहरातील क्लासेसचा आधार न घेता, घरातूनच नियमित आणि नियोजनबद्ध अभ्यास करून जयदीपने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर सुरेगाव ग्रामस्थांच्या वतीने जयदीप शिंदे व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. भविष्यात नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन देशसेवा करण्याचे जयदीपचे स्वप्न असून, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Previous Post

शिरूरकरांना मोठा दिलासा : हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला

Next Post

NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम ॲपवर भारतात तात्पुरते निर्बंध; ‘NTA’चा मोठा निर्णय

Related Posts

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
38
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!
Blog

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026
6
Blog

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

November 7, 2026
4
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
Blog

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
7
ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
42
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
35
Next Post

NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम ॲपवर भारतात तात्पुरते निर्बंध; ‘NTA’चा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In