• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरकरांना मोठा दिलासा : हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

पुढील ४० ते ४५ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली
आमदार माऊलीआबा कटके यांच्या पाठपुराव्यास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे यांचे समन्वयपूर्ण सहकार्य

पुणे प्रतिनिधी

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

शिरूर : मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता, वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्याबाबत निर्माण झालेली संभाव्य चिंता लक्षात घेता शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास दूर झाली असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल, अशी माहिती शिरूर नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.

सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराचा पाणीपुरवठा घोडनदीवरील हत्तीडोह बंधाऱ्यावर अवलंबून आहे. सुमारे ५५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा बंधारा सध्या पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यामुळे शहरासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, आगामी काही आठवड्यांतील पाणीटंचाईची शक्यता मोठ्या प्रमाणात टळली आहे.

शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शिरूर नगरपरिषदेने कुकडी विभागाच्या ६१ क्रमांकाच्या वितरिकेतून हत्तीडोह बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला गती देण्यासाठी शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीआबा कटके यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शिरूर शहरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.

या प्रयत्नांना नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे तसेच पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे यांनी प्रभावी समन्वय साधत सहकार्य केले. विविध स्तरांवर केलेल्या समन्वयात्मक प्रयत्नांना यश मिळाल्याने हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, शिरूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील ४० ते ४५ दिवसांसाठी मार्गी लागला आहे.

बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे, महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजीत पाचर्णे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी यांनी हत्तीडोह बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध जलसाठ्याची माहिती घेतली व पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन :

“हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शिरूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल. नागरिकांनी पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे.”
— शिरूर नगरपरिषद प्रशासन

Tags: Avinash Ghogare
Previous Post

दाते पंचांगाचा अंदाज; सध्या पाऊस का थांबला आणि वरुणराजा कधी बरसणार?

Next Post

सुरेगावच्या जयदीप शिंदेचा MHT-CET परीक्षेत धमाका; पहिल्याच प्रयत्नात ९९.६४ पर्सेंटाईल गुण मिळवून तालुक्यात प्रथम

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
167
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
61
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

सुरेगावच्या जयदीप शिंदेचा MHT-CET परीक्षेत धमाका; पहिल्याच प्रयत्नात ९९.६४ पर्सेंटाईल गुण मिळवून तालुक्यात प्रथम

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In