• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

बँकॉक (थायलंड) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत “उत्कृष्ट पर्यावरणीय शाश्वतता पुरस्कार” प्राप्त करून देशाचे व महाराष्ट्राचे नाव उंचावणारे फक्राबाद येथील सुपुत्र, युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांचा ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड येथे विशेष सत्कार करण्यात आला.

ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. शोभाताई अरोळे यांच्या हस्ते रणजित राऊत यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

यावेळी ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेडचे ज्येष्ठ समाजसेवक जयेश कांबळे तसेच मधुकर वाळूंजकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रणजित राऊत यांच्या संशोधन कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी विज्ञान, पर्यावरण, जैवविविधता संवर्धन व संशोधन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.

रणजित राऊत यांनी पर्यावरणीय शाश्वतता, जैवविविधता संवर्धन आणि समाजाभिमुख संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. बँकॉक येथे मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर झालेली दखल असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रणजित राऊत यांनी हा पुरस्कार पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्व संशोधक, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांना समर्पित असल्याचे सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम ॲपवर भारतात तात्पुरते निर्बंध; ‘NTA’चा मोठा निर्णय

Next Post

सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुभाष लोंढे यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
19
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुभाष लोंढे यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In