• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण समुद्रात बेपत्ता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

गणपतीपुळे | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (दि. २० जून) सकाळी अतिशय दुर्दैवी घटना घडली. देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटकांच्या गटातील पाच तरुण समुद्राच्या तीव्र लाटांमध्ये वाहून गेल्याची घटना घडली असून सायंकाळपर्यंत ते बेपत्ता होते. त्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

RelatedPosts

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

प्राथमिक माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बीडकिंन येथील १९ जणांचा गट शुक्रवारी (दि. १९ जून) गणपतीपुळे येथे दाखल झाला होता. शनिवारी सकाळी स्वयंभू श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गटातील काही तरुण समुद्रस्नानासाठी उतरले. त्यावेळी समुद्रातील तीव्र प्रवाह आणि मोठ्या लाटांचा अंदाज न आल्याने पाच तरुण खोल पाण्यात ओढले गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, जीवरक्षक, होमगार्ड आणि पोलीस प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र समुद्रातील प्रचंड करंट आणि उधाणलेल्या लाटांमुळे शोधमोहीमेत अडथळे निर्माण होत आहेत. कस्टम विभाग तसेच स्थानिक मच्छीमारांच्या बोटींची मदतही शोधकार्यासाठी घेण्यात येत आहे.

समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) (सर्व रा. बीडकिंन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण मित्रांसोबत देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यटकांनी खोल समुद्रात जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रकिनारी विशेष गस्त वाढविण्यात आली असून पर्यटकांना धोकादायक भागांबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रातील धोक्याच्या सूचना दुर्लक्षित करून खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांमुळे अशा घटना घडत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुभाष लोंढे यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

Next Post

महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Related Posts

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Blog

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
0
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
0
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026
2
Blog

गौंडगावात एनसीडी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर

September 23, 2026
3
हर्दखळे ग्रामपंचायतीतील माजी सरपंचांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीतील माजी सरपंचांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी

September 23, 2026
5
Blog

बरडगाव परिसरात वीज कोसळून पाच शेळ्यांचा मृत्यू

September 23, 2026
2
Next Post

महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

ताज्या बातम्या

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In