• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित सेवा मार्गाचा उपक्रम; १८० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे (थेरगाव), दि. १८ :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक गुरुपीठ व श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित सेवा केंद्रांतर्गत स्वयंरोजगार विभागाच्या वतीने महिलांसाठी व युवतींसाठी मोफत परफ्यूम, मेणबत्ती आणि कापडी पिशवी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा थेरगाव, पिंपरी-चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान पार पडली.

कार्यशाळेचे मार्गदर्शन नाशिक शहर स्वयंरोजगार विभागाच्या प्रतिनिधी सौ. शलाका रवींद्र वैष्णव यांनी केले. त्यांनी महिलांना कला, कौशल्य, उद्योगनिर्मिती आणि रोजगाराच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी स्वावलंबी बनून घरबसल्या उद्योग सुरू करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

RelatedPosts

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

या प्रशिक्षणात महिलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मेणबत्ती, अत्तर, परफ्यूम आणि कापडी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कमी खर्चात, कमी जागेत आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याच्या विविध संधींबाबत माहिती देण्यात आली. तसेच सोशल मीडिया आणि ऑनलाईन माध्यमातून व्यवसाय वाढविण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

स्वयंरोजगार विभागामार्फत महिलांसाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जातात. परफ्यूम, मेणबत्त्या, कापडी व कागदी पिशव्या, आकाशदिवे, पणत्या, शाडू मातीचे गणपती अशा वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अधिकृत प्रमाणपत्रही देण्यात आले. प्रशिक्षणासाठी आलेल्या महिलांची बेरोजगार नोंदणी देखील करण्यात आली. बाहेरगावाहून आलेल्या महिलांसाठी प्रसादरूपी भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

या मोफत प्रशिक्षण कार्यशाळेत थेरगावसह रावेत, भोसरी, सांगवी, दिघी तसेच इतर परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. एकूण १८० महिला व युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

कार्यक्रमास थेरगावचे स्वयंरोजगार विभाग प्रतिनिधी श्री. शिवराज भोसले, नाशिकच्या स्वयंरोजगार विभागाच्या प्रतिनिधी सौ. शलाका वैष्णव, दिघीच्या राजश्री देशमुख तसेच विविध सेवा केंद्रांचे प्रतिनिधी, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण समुद्रात बेपत्ता

Next Post

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त तिसफोडीपाडा शाळेचा नवा आदर्श

Related Posts

Blog

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

June 20, 2026
0
Blog

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 20, 2026
0
Blog

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

June 20, 2026
0
Blog

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण

June 20, 2026
0
Blog

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण समुद्रात बेपत्ता

June 20, 2026
0
Blog

सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुभाष लोंढे यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

June 20, 2026
2
Next Post

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त तिसफोडीपाडा शाळेचा नवा आदर्श

ताज्या बातम्या

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

June 20, 2026

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

June 20, 2026

हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

June 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In