• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त तिसफोडीपाडा शाळेचा नवा आदर्श

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १९ (प्रतिनिधी) :
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्यात आदर्श ठरलेल्या अक्राणी तालुक्यातील जि.प. शाळा तिसफोडीपाडा (शेलकुवी) येथील शिक्षकांनी पुन्हा एकदा समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. शाळेचा गुणवंत विद्यार्थी सहन मेरसिंग पावरा याच्या पुढील शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत त्याला रोख १० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली.

गुणवंत विद्यार्थी सहन पावरा हा धडगाव (अक्राणी) तालुक्यातील बिलगाव हेद्र्यापाडा या अतिदुर्गम भागातील रहिवासी आहे. आजही त्याच्या गावात वीज, रस्ता आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, आई-वडील रोजंदारी मजुरी करून संसाराचा गाडा चालवतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सहनने शिक्षणाची जिद्द कायम ठेवत आपल्या मेहनतीच्या जोरावर सरस्वती विद्या अकॅडमी, लोणावळा (पुणे) येथे प्रवेश मिळवला असून तेथेही त्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सहनच्या या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक भगतसिंग पावरा, शिक्षक अशोक ठाकरे, नंदलाल पावरा, पंढरीनाथ धनगर, शिक्षणप्रेमी अभिमान पावरा तसेच शेलकुवी ग्रामपंचायतीचे सरपंच पिंटू पावरा यांनी स्वखर्चातून आर्थिक मदत उभी केली.

यावेळी शाळेत “मुलाबरोबर त्याच्या पालकांचाही गौरव” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहनच्या यशाबरोबरच त्याला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देणाऱ्या त्याच्या पालकांच्या संघर्षालाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख आर. जी. बळसाने यांच्या हस्ते सहनच्या वडिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रप्रमुखांनी सहनला शैक्षणिक साहित्य आणि वैयक्तिक आर्थिक मदतही सुपूर्द केली.

यावेळी बोलताना केंद्रप्रमुख आर. जी. बळसाने म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी शाळा ही मातृतुल्य असते. शाळेने दिलेल्या संस्कारांची आणि शिक्षणाची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्याची दिशा निश्चित केली पाहिजे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.”

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास शेलकुवी व परिसरातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे राहत शिक्षकांनी दाखवलेले दातृत्व आणि पालकांचा केलेला सन्मान सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा व प्रेरणादायी विषय ठरत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Next Post

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
29
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
65
Next Post

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In