• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १९ (प्रतिनिधी) :
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शहादा (लोणखेडा) येथे राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारातर्फे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण करण्यात आले. शहादा आगाराचे स्थानक प्रमुख पी. जी. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना बस पास सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल, आगार स्थानक प्रमुख पी. जी. पाटील, आगार व्यवस्थापक हरीश भोई, वाहतूक नियंत्रक रवींद्र पवार, वाहतूक नियंत्रक नितीन कोळी, प्रा. व्ही. सी. डोळे, प्रा. ए. पी. पाटील, बस पास समितीच्या संयोजिका प्रा. रेखा पाटील, समिती सदस्य प्रा. सविता पाटील, प्रा. मितेश्वरी पाटील, प्रा. योगिता पाटील, प्रा. मधुकर ठाकरे आणि प्रा. शैलेंद्र पाटील उपस्थित होते.

RelatedPosts

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी शहरात ये-जा करताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाने ‘मानव विकास मिशन’ तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थिनींपर्यंत सुलभपणे पोहोचावा यासाठी शहादा आगाराच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन पासचे वितरण केले.

यावेळी मार्गदर्शन करताना स्थानक प्रमुख पी. जी. पाटील यांनी सांगितले की, “विद्यार्थी आणि पालकांनी पास काढण्यासाठी आगारात येऊन गर्दी करण्याची किंवा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. सर्व पास महाविद्यालयातच उपलब्ध करून दिले जातील.”

उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल म्हणाल्या, “शासनाच्या या योजनांमुळे ग्रामीण भागातील मुलींना इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे अधिक सोपे झाले आहे. परिस्थितीअभावी कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनणे ही काळाची गरज आहे.”

या उपक्रमाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शहादा आगाराच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले तसेच त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले.

Previous Post

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त तिसफोडीपाडा शाळेचा नवा आदर्श

Next Post

शहादा पोलिसांच्या कारवाईत दहा चाकी कंटेनरसह तब्बल ९० लाखांची अवैध विदेशी दारू जप्त

Related Posts

Blog

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

June 20, 2026
0
Blog

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 20, 2026
0
Blog

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

June 20, 2026
0
Blog

महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

June 20, 2026
0
Blog

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण समुद्रात बेपत्ता

June 20, 2026
0
Blog

सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुभाष लोंढे यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

June 20, 2026
2
Next Post

शहादा पोलिसांच्या कारवाईत दहा चाकी कंटेनरसह तब्बल ९० लाखांची अवैध विदेशी दारू जप्त

ताज्या बातम्या

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

June 20, 2026

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

June 20, 2026

हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

June 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In