• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा पोलिसांच्या कारवाईत दहा चाकी कंटेनरसह तब्बल ९० लाखांची अवैध विदेशी दारू जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २० (का.प्र.) :
मध्य प्रदेश मार्गे हरियाणातून गुजरात राज्याकडे विदेशी दारूची मोठी खेप घेऊन जाणारा दहा चाकी कंटेनर शहादा पोलिसांनी शिताफीने पकडला आहे. शहादा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील आणि गुन्हे शोध पथकाने प्रकाशा गावाजवळ सापळा रचून ही धडक कारवाई केली. या कारवाईत ६५ लाख २९ हजार २०० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ९० लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हरियाणा राज्यातून विदेशी दारूने भरलेला एक दहा चाकी कंटेनर शहादा-प्रकाशा मार्गे गुजरातच्या दिशेने जाणार होता. या माहितीच्या आधारे शहादा डीबी पथकाने शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रकाशा परिसरातील वैजाली रस्त्यावरून येणाऱ्या अशोक लेलँड कंटेनर क्रमांक RG 32 GC 0812 ला अडवले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता, त्याने कंटेनरमध्ये घरगुती सामान असल्याचा बनाव केला. मात्र त्याचा संशयास्पद वावर पाहून पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी चालक व वाहक घाबरले आणि वाहनात अवैध विदेशी दारू असल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर वाहन शहादा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

रात्री उशिरा कंटेनरमधील बॉक्स उतरवून तपासणी केली असता, त्यात नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त करून चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत एपीआय संदीप वाघ, एएसआय चंद्रकांत देसले, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावळे आणि कपिल मंदिल यांनी सहभाग घेतला.

या मोठ्या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातकडे होणाऱ्या अवैध दारू तस्करीला मोठा आळा बसला असून नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे. तसेच या मार्गावर अवैध गुटखा वाहतुकीचाही संशय व्यक्त होत असून याप्रकरणीही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण

Next Post

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
29
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
65
Next Post

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In