• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी :
वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारूविक्री आणि निर्मितीला आळा घालण्यासाठी सेवाग्राम पोलिसांनी दि. २० जून २०२६ रोजी विशेष “वॉशआऊट” मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत ६ लाख ८६ हजार ८०० रुपयांचा गावठी दारूसाठा व साहित्य नष्ट करण्यात आले असून चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मदणी, म्हसाळा आणि बरबडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी मोहाची दारू तयार करून साठवली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून संबंधित भागात पाळत ठेवली.

RelatedPosts

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात सकाळी साडेपाच वाजल्यापासून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान आरोपी अवचित मोरोतराव तेलंगे, निलेश उत्तमराव कौरती (दोघे रा. मदणी), शैलेश माटे (रा. नागसेन नगर, नालवाडी, वर्धा) आणि सुधाकर चितामण लेंडे (रा. बरबडी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान पोलिसांनी नवीन कायद्यानुसार ‘ई-साक्ष’ (E-Sakshya) अॅप्लिकेशनचा वापर करून तांत्रिक पुरावेही संकलित केले.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बांबर्डे, सहाय्यक फौजदार मारोती कातकर, पोलीस हवालदार सचिन सोनटक्के, किशोर पेटकुले, मनोज वाघमारे, धिरज मिसाळ तसेच होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला.

या अचानक राबविण्यात आलेल्या “वॉशआऊट” मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांच्यात खळबळ उडाली असून भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Previous Post

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

Next Post

हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Blog

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
0
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
0
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026
2
Blog

गौंडगावात एनसीडी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर

September 23, 2026
3
हर्दखळे ग्रामपंचायतीतील माजी सरपंचांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीतील माजी सरपंचांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी

September 23, 2026
5
Blog

बरडगाव परिसरात वीज कोसळून पाच शेळ्यांचा मृत्यू

September 23, 2026
2
Next Post

हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In