• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in क्राईम
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

आर्वी | प्रतिनिधी वर्धा :
आर्वी पोलिसांनी हरदोली रोड परिसरात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

या प्रकरणात स्वप्नील विजयराव कांबळे (वय २२, रा. वाल्मीक वॉर्ड, आर्वी) आणि राजू सुखदेवराव इंगळे (वय २४, रा. वाल्मीक वॉर्ड, आर्वी) यांना अटक करण्यात आली आहे.

RelatedPosts

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत

२ किलो गांजासह एकास अटक

पोलिसांनी हरदोली रोडवर संशयित मालवाहू वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये पाच गोवंश अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती तसेच प्रथमोपचार सुविधाही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचनामा करून गोवंशांची सुटका करण्यात आली.

कारवाईदरम्यान झेनॉन पिकअप वाहन (क्र. एमएच-३२ क्यू-२४७१) किंमत अंदाजे ६ लाख रुपये आणि पाच गोवंश किंमत ५० हजार रुपये असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘पिपल फॉर ॲनिमल्स’ संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम, प्राणी परिवहन अधिनियम तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन व संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील दिगांबर रूंईकर, ऋषिकेश गंगारे, सूरज रिठे, सूरज बावरी आणि सागर पाचोडे यांनी पार पाडली.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

Next Post

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

Related Posts

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!
क्राईम

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

November 7, 2026
27
गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत
क्राईम

गडचिरोलीत १२ हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता अटकेत

October 29, 2026
3
२ किलो गांजासह एकास अटक
क्राईम

२ किलो गांजासह एकास अटक

October 29, 2026
3
क्राईम

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

October 18, 2026
8
बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
Next Post

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

ताज्या बातम्या

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In