• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी :
दि. १८ जून २०२६ रोजी सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे आणि त्यांच्या पथकाने अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ८३ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले.

पहिली कारवाई शिवारातील स्मशानभूमीजवळ करण्यात आली. येथे पोलिसांना चार लोखंडी ड्रममध्ये प्रत्येकी १८० लिटरप्रमाणे एकूण ७२० लिटर कच्चे मोहा रसायन सापडले. याशिवाय १८ लिटर गावठी मोहा दारू, प्लास्टिक डबकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत १ लाख ५७ हजार ६०० रुपये इतकी होती. या प्रकरणी आरोपी संदिप उडान (रा. खापरी) याच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

त्यानंतर जयपूर शेतशिवारातील बोर नदीकाठी दुसरी कारवाई करण्यात आली. येथे एका लोखंडी ड्रममध्ये २०० लिटर आणि चार प्लास्टिक ड्रममध्ये ४०० लिटर कच्चा मोहा सडवा मिळून आला. तसेच भट्टीसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत १ लाख २६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही कारवायांमध्ये मिळून २ लाख ८३ हजार ६०० रुपयांचे गावठी दारू भट्टीचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ठाणेदार पंकज वाघोडे यांच्यासह प्रंशात श्रीवास्तव, शरद इंगोले, सचिन वाटखेडे, विनायक गोडे तसेच खापरीच्या पोलीस पाटील नम्रता गव्हाळे यांनी सहभाग घेतला.

Tags: Shankar Panbude
Previous Post

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पिंपरी येथील प्रणय मात्रेचे उत्कृष्ट यश

Next Post

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
179
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
8
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

ताज्या बातम्या

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

September 23, 2026
वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

September 23, 2026

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In