• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

देवळी | प्रतिनिधी :
पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेंतर्गत देवळी पोलिसांनी मिसिंग व अपहरण प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक मुला-मुलींचा शोध लावण्यात यश मिळवले आहे.

दि. ८ जून २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत दाखल असलेल्या मिसिंग व अपहरण प्रकरणांचा आढावा घेऊन देवळी पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान मिसिंग क्रमांक १७/२६, २०/२६, २७/२६ आणि ३१/२६ मधील चार मुलींचा शोध घेण्यात आला. तसेच मिसिंग क्रमांक २६/२६ आणि २८/२६ मधील दोन मुलांचाही शोध पोलिसांनी कौशल्याने लावला.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

याशिवाय पोलीस स्टेशन देवळी येथील गुन्हा क्रमांक २२८/२६ कलम १३७(२) अंतर्गत १८ वर्षांखालील मुलीचा शोध घेऊन संबंधित आरोपीस ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

तसेच नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांक ५/२०२६ मधील पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीसह तिला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या मोहिमेत एकूण सात मुली आणि दोन मुलांचा शोध घेण्यात देवळी पोलिसांना यश आले असून उर्वरित प्रकरणांचाही तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार संदीप कापडे यांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना खारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, शिवराज जाधव तसेच पोलीस कर्मचारी सतीश दरवरे, दुर्गेश बानदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In