• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; श्री. एन. के. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक निरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

पाथरी : श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर, पाथरी येथे २०१७ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. एन. के. कुलकर्णी यांना साई स्मारक समिती विश्वस्त मंडळाच्या वतीने सन्मानपूर्वक सेवापूर्ती निरोप देण्यात आला.

श्री. कुलकर्णी हे यापूर्वी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे अधीक्षक (सामान्य प्रशासन) पदावर कार्यरत होते. शिर्डी संस्थानमधील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ पाथरी येथील श्री साईबाबा जन्मस्थान मंदिराला मोठ्या प्रमाणात झाला. तत्कालीन अध्यक्ष कै. सिताराम सोमा धानू यांच्या विनंतीवरून त्यांनी २०१७ मध्ये पाथरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

आपल्या कार्यकाळात त्यांनी मंदिरातील आस्थापना व्यवस्थापन, सेवेकऱ्यांचे कामकाज नियोजन, प्रशासनातील शिस्त आणि विविध सकारात्मक बदल घडवून आणले. तसेच देशभरातील साई भक्तांशी असलेल्या संपर्कातून श्री साईबाबांच्या जन्मस्थानाविषयीची माहिती अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

अलीकडेच त्यांची अँजिओप्लास्टी तसेच डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. साई स्मारक समितीने त्यांचा राजीनामा आदरपूर्वक स्वीकारत त्यांच्या सेवेला गौरवपूर्ण निरोप दिला.

त्यांच्या पत्नी सौ. छाया कुलकर्णी यांनीही मंदिरातील नैवेद्य व्यवस्था आणि प्रशासनात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी काही काळ मंदिर अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या मुलगा साईप्रसाद यांच्यासह संपूर्ण कुलकर्णी कुटुंबावर साईबाबांची विशेष कृपा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

साई स्मारक समिती ट्रस्ट, पाथरीच्या वतीने अध्यक्ष श्री. सुभाष दळी यांच्या हस्ते श्री. एन. के. कुलकर्णी, सौ. छाया कुलकर्णी आणि साईप्रसाद कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ व साईबाबांच्या आशीर्वाद स्वरूप भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड. अतुल चौधरी, विश्वस्त श्री. सांगडे, श्री. कालिदास चौधरी, श्री. संजय भुसारी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुकुंदराव चौधरी तसेच मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आजरा तालुक्यातील बिनशेती (NA) प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी

Next Post

कान्हाळगाव रस्ता विस्कळीत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत तीव्र नाराजी

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
48
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
60
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

कान्हाळगाव रस्ता विस्कळीत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत तीव्र नाराजी

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In