• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुक्यातील बिनशेती (NA) प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 21, 2026
in Blog
0
0
SHARES
126
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

आजरा तालुक्यात सन २०१० ते २०२६ या कालावधीत मंजूर झालेल्या सर्व बिनशेती (N.A.) प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संविधान संवर्धन चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

संघटनेचे प्रमुख संग्राम सावंत यांनी दिलेल्या निवेदनात अनेक बिनशेती प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विविध गट क्रमांकांमध्ये फेरफार, आवश्यक विभागांची ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) न घेणे, टाऊन प्लॅनिंगची मंजुरी नसणे, ओपन स्पेस व अमेनिटी जागा न सोडणे तसेच काही ठिकाणी सरकारी जमिनीवरील अतिक्रमणास मंजुरी दिल्याचे आरोप निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.

बुरुडे (ता. आजरा) येथील नव्याने विकसित झालेल्या भावेश्वरी कॉलनीतील रहिवाशांना रस्ते, गटारे, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या नागरिकांना तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

तसेच तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व बिनशेती प्रकरणांची चौकशी करून संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व इतर जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने चौकशी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली असून, लवकर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर संग्राम सावंत यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे आजरा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

कोल्हापूरच्या वैभवात भर : ₹१,५०० कोटींच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन

Next Post

सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; श्री. एन. के. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक निरोप

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
9
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
20
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; श्री. एन. के. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक निरोप

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In