• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक : सईद खान यांच्या विजयानंतर कृतज्ञता सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

विटेकर, गुट्टे यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने राजकीय चर्चांना उधाण

परभणी | प्रतिनिधी :

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर आयोजित पत्रकार परिषद आणि जाहीर आभार कार्यक्रमात त्यांनी महायुतीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. मात्र, या विजयी भाषणात महायुतीतील महत्त्वाचे नेते आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

नेत्यांच्या नावांच्या ‘वगळणी’ची चर्चा

निवडणुकीच्या काळात महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. सईद खान यांनी आपल्या भाषणात अनेक प्रमुख नेत्यांचे आभार मानले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार राजेश विटेकर आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ही बाब केवळ दुर्लक्ष होती की त्यामागे काही राजकीय संदेश दडलेला होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

महायुतीची सर्व मते मिळाली का?

याच पार्श्वभूमीवर महायुतीची सर्व मते सईद खान यांच्या पारड्यात पडली का, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या आकडेवारीनंतर काही मतांमध्ये तफावत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही स्थानिक नेत्यांकडून खासगीत ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याच्या चर्चाही केल्या जात आहेत. या संभाव्य नाराजीमुळेच संबंधित आमदारांची नावे भाषणातून वगळली गेली असावीत, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

सईद खान यांच्या विजयानंतर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. मात्र, या जल्लोषात काही प्रमुख नेत्यांची भूमिका आणि त्यांच्या समर्थकांची शांतता अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली.

राजकीय जाणकारांच्या मते, “विजय मिळाला असला तरी महायुतीमधील अंतर्गत समन्वय पूर्णपणे सुरळीत नसल्याचे संकेत या संपूर्ण घडामोडीतून दिसून येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दुरावा महायुतीसाठी कितपत परिणामकारक ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”

या संपूर्ण प्रकरणावर आता आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

ताडबोरगावजवळ भीषण अपघात; कार-मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Next Post

मासोद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
19
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

मासोद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In