वर्धा प्रतिनिधी :
मासोद, दि. 21 जून 2026 : आयुष्मान आरोग्य मंदिर, मासोद (आयुष) येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात योग शिक्षक निलेश सर यांनी विविध योगासने करून दाखवत प्रत्येक योगासनाचे महत्त्व आणि नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व स्पष्ट करत मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच उपस्थित नागरिकांना आयुष कॅलेंडरचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुवर्ण तागडे (सरपंच, मासोद), पाटील मॅडम (मुख्याध्यापिका), पाठभाजे सर, ताकसांडे सर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संकल्प वानखेडे (आरोग्य सेवक), भावना केंडे (आरोग्य सेविका), चंदा मडावी (आरोग्य सेविका), मेघा वरखडे, कल्पना अलगुनवार, रुपाली उईके (आशा स्वयंसेविका) यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्प करत “योग करा, निरोगी रहा” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
