• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाळू माफियांविरोधात दलित मृत्यू आक्रोश मोर्चा व जलसमाधी आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात आणि या प्रकारामुळे दलित युवकाच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने दोन दिवसीय तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

या आंदोलनाची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात येणार असून, कामगार नेते तथा ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे (B.A. LL.B.) हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे रोहन निलेश केदारे (वय १६) या दलित युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधित वाळू माफियांवर तातडीने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करावी तसेच महसूल आयुक्त, नाशिक यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनाचे स्वरूप

  • दिनांक २५ जून २०२६
    दुपारी २ वाजता दारणा नदी परिसरात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.
  • दिनांक ३० जून २०२६
    दुपारी २ वाजता नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयावर दलित मृत्यू आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

हे आंदोलन कामगार नेते जगन भाऊ सोनवणे आणि महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. पुष्पाताई जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

दरम्यान, भुसावळ येथील संविधान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

नाशिक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी संवदनाताई काळे गवळी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, संविधानवादी आणि आंबेडकरवादी जनतेने एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे.

यावेळी संविधान आर्मीचे जिल्हाध्यक्ष शार्दुल भाई, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मणियार साहेब तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

महापुरुषांना अभिवादन करत न्यायाच्या लढ्याला प्रारंभ

Next Post

सिन्नर : वावी भागातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे, छत्री व स्कूल बॅग वाटप

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
16
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

सिन्नर : वावी भागातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे, छत्री व स्कूल बॅग वाटप

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In