• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामसेविका दिपिका उगलमुगले यांच्यावर गावकऱ्यांचा गंभीर आरोप; निलंबनाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

तीन महिने गैरहजर राहून गावकऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप; आंदोलनाचा इशारा

धडगाव | प्रतिनिधी

पिंपर्डे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील ग्रामसेविका दिपिका अरविंद उगलमुगले या गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात अनुपस्थित राहत असून गावकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना धमकी देणे, गैरवर्तन करणे आणि जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

यासंदर्भात बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे, विजय पावरा, दिनेश वाघ, गंगाधर पवार, शरद पवार, श्रावण वाघ, ईश्वर भील, एकनाथ पावरा, राहूल वाघ, प्रविण ईशी, सागर वाघ, सागर पावरा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक हा शासन आणि गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून महसूल वसुली, शासकीय योजना राबविणे, जन्म-मृत्यू नोंदी ठेवणे, विविध दाखले देणे तसेच ग्रामसभेतील प्रश्न सोडविणे यांसारखी जबाबदारी ग्रामसेवकावर असते. मात्र, ग्रामसेविका दिपिका उगलमुगले या गेल्या तीन महिन्यांपासून कार्यालयात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे काम करणारे शिपाई दिनेश वाघ यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना धमक्या दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. “तू समोर भेट फक्त आता दाखवते तुला, तू विचार करून ठेव आता,” असा धमकीचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उपसरपंच घनश्याम मराठे यांनी ग्रामसेविका उगलमुगले या गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत असून कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप केला. हे वर्तन ग्रामसेवक पदाला अशोभनीय असून ग्रामपंचायतीच्या हिताचे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ग्रामसेविकेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Previous Post

सुरेगाव (गंगा) व बोरगाव येथे बिबट्या हल्ल्याची घटना; वन विभागाकडून पाहणी

Next Post

जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशनचा केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार

Related Posts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
0
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
9
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
Next Post

जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशनचा केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार

ताज्या बातम्या

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In