• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम निमित्त ताजियाची स्थापना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

मोहरम पर्वानिमित्त ताजिया स्थापनेची परंपरा जपली जात असून, श्रीगोंदा येथील शेख महंमद बाबा दर्गाह येथे पारंपरिक पद्धतीने ताजिया (ताबुत) स्थापना करण्यात आली आहे.

RelatedPosts

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरू म्हणून ओळखले जाणारे सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या दर्गाहमध्ये ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेख महंमद बाबा यांच्या वंशजांकडून ही धार्मिक परंपरा जतन केली जात असून, यंदाही दि. १७ जून २०२६ रोजी पारंपरिक रुढी-परंपरेनुसार ताजियाची स्थापना करण्यात आली.

श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील विविध भागांतही ताजिया, सवारी आणि पंजाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये जावेद फकीर, राजू मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार आदींचा सहभाग आहे.

शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी ताजियाचे विसर्जन करण्यात येणार असून, रविवार दि. २८ जून रोजी ‘तिजायत’ निमित्त शेख महंमद बाबा दरबारात खिचाडा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष तथा शेख महंमद बाबा यांचे वंशज नगरसेवक आमीनभाई शेख यांनी केले आहे.

चौकट

मोहरम उत्सवासाठी दौलतराव शिंदे घराण्याकडून निधी

मोहरम निमित्त शेख महंमद बाबा दरबारात ताजिया (ताबुत) स्थापना केली जाते. या उत्सवासाठी पूर्वीपासून दौलतराव शिंदे घराण्याकडून निधी दिला जात असल्याची सनद उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. दरवर्षी मोहरमच्या निमित्ताने येथे दहा दिवस मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीयांच्या सहभागातून उत्सव साजरा केला जातो.

Previous Post

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचे उपोषण; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Next Post

येणेगुर येथे एकल महिला निवारण कार्यक्रमाचे आयोजन; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार

Related Posts

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
0
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
1
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
Next Post

येणेगुर येथे एकल महिला निवारण कार्यक्रमाचे आयोजन; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In