• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचे उपोषण; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

कुकडी प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्यासाठी तसेच रखडलेल्या दुरुस्ती कामांसाठी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन छेडले. मारुती भापकर व कृष्ण यादव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपोषणात अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

RelatedPosts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

या आंदोलनात सुभाष पणदरकर, अनंता कदम, शिवाजी भोर, रंगनाथ कदम, सुभाष गलबते, गणपत नलगे, अमोल पणदरकर, शिवाजी भापकर, युवराज भापकर, सुदाम रामसिंग, पिंटू नलगे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या होत्या :

  1. हंगा डी.ओ.चे पक्के लोखंडी गेट बसवण्यात यावे.
  2. डी.वाय. ८ ची मायनर चारी क्रमांक १ शेतकऱ्यांनी बुजवली असून ती पूर्ववत सुरू करून द्यावी.
  3. मायनर चारी क्रमांक ४५ अनेक ठिकाणी बुजल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, ती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे तसेच उपअभियंता बबनराव वाळके यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून मागणी क्रमांक २ आणि ३ मान्य करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन दिले.

प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मारुती भापकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post

श्रीगोंदा तालुक्यात वीज पडून २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; घोडेगाव परिसरावर शोककळा

Next Post

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम निमित्त ताजियाची स्थापना

Related Posts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
0
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
2
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
2
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
22
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
Next Post

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम निमित्त ताजियाची स्थापना

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In