• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येणेगुर येथे एकल महिला निवारण कार्यक्रमाचे आयोजन; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

उमरगा प्रतिनिधी

दि. २३ जून रोजी येणेगुर ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी विशेष निवारण कार्यक्रम व बैठकीचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

महिला व बालविकास मंत्रालयाच्या शासन परिपत्रकानुसार तसेच मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रामपंचायत प्रशासन, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांच्या समस्या गाव आणि प्रभाग स्तरावर सोडवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत प्रामुख्याने श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ एकल महिलांना मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अनेक महिलांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने त्या योजनांपासून वंचित राहत असल्याची बाब यावेळी समोर आली. यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी एल. जी. कांबळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, रेशन कार्ड आदी कागदपत्रे तातडीने पूर्ण करून देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

यावेळी गावच्या सरपंच रेखाताई गुंजोटे यांनी एकल महिलांचा सन्मान राखण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन त्यांना शासकीय योजनांमध्ये प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. तसेच गावातील कार्यकर्त्यांना एकल महिलांची यादी आठ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच बाबासाहेब गायकवाड, विश्वनाथ गुंजोटे, सिद्धेश्वर हिप्परगे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष, कर्मचारी सचिन दूधभाते, खुर्शीद येळीकर, सोनू घंटे, कुमार येडगे तसेच गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना शासकीय योजनांची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली. महिला व बालविकास आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अशा प्रकारच्या निवारण बैठका महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरही टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Previous Post

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम निमित्त ताजियाची स्थापना

Next Post

मागील ७ दिवसांत ८ फरार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक

Related Posts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
0
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
25
Next Post

मागील ७ दिवसांत ८ फरार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक

ताज्या बातम्या

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In