• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खोलापूर पोलीसांची गुटखा विक्रीविरोधात कारवाई; ४ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

अमरावती ग्रामीण | प्रतिनिधी

मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम यांनी पोलीस स्टेशन हद्दीत वरळी जुगार, अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी, अवैध रेती उत्खनन, गोवंश वाहतूक तसेच गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिले आहेत.

RelatedPosts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

त्या अनुषंगाने दि. २२ जून २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खोलापूर पोलीसांनी धामोरी येथील शाम मोहन मिश्रा (वय ३९ वर्षे, रा. धामोरी, ता. भातकुली, जि. अमरावती) यांच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :
१) बाजीराव गोल्ड पान मसाला – २० पॅकेट
२) मस्तानी सुगंधी मसाला
३) सुगंधित तंबाखू – ५ पॅकेट

जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे ४ हजार ५४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी खोलापूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ११०/२०२६ दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ तसेच बीएनएससी अंतर्गत कलम २२३, २७४, २७५ व १२३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार, मा. अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खोलापूर पोलीस स्टेशनचे एपीआय अनुप वाकडे यांनी केली.

Previous Post

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

सावली न्यायालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन संपन्न

Related Posts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
0
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
6
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
Next Post

सावली न्यायालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन संपन्न

ताज्या बातम्या

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In