• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

भुसावळ विभागातील ओढा रेल्वे स्थानक परिसरात मानवतेचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. स्थानक परिसरात उभ्या असलेल्या मालगाडीच्या १३ क्रमांकाच्या डब्यात एका नवजात बालिकेला कपड्यात गुंडाळून सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि एमएसएफ (MSF) जवानांच्या सतर्कतेमुळे या चिमुकलीचे प्राण वाचले.

RelatedPosts

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे नियमित गस्तीदरम्यान आरपीएफ कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफ कर्मचारी प्रशांत जगताप हे मालगाडीची तपासणी करत होते. पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास एका डब्यातून नवजात बालिकेच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. आवाजाच्या दिशेने शोध घेतल्यानंतर मालगाडीच्या डब्यात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बालिका आढळून आली.

यानंतर जवानांनी तत्काळ रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जीआरपी तसेच चाईल्डलाईन प्रतिनिधींना माहिती दिली. बालिकेला सुरक्षित बाहेर काढून तातडीने भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या “ऑपरेशन जीवन रक्षा” अंतर्गत करण्यात आलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परता, सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, नवजात बालिकेला अशा अमानुष पद्धतीने मालगाडीच्या डब्यात कोण आणि का सोडून गेले, याचा शोध रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.

आरपीएफचे कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफ कर्मचारी प्रशांत जगताप यांनी दाखविलेल्या मानवतावादी कार्यामुळे एका निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Tags: Maheshprasad Dikshit
Previous Post

ग्रामीण रोजगार व उद्योजक निर्मिती प्रशिक्षण मंडळाची ‘सुवर्ण संधी’ योजना

Next Post

७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; चाळीसगावात खळबळ

Related Posts

ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
5
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
7
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
4
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
4
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
37
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
Next Post

७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; चाळीसगावात खळबळ

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In