• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगेला वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

५ जुलैला कुरुंदवाडमध्ये सर्वपक्षीय मेळावा; आंदोलनाचे रणशिंग फुंकणार

प्रतिनिधी :

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार असून, या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी कुरुंदवाड येथे सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

कुरुंदवाड येथील टेनिस क्लब हॉलमध्ये आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पंचगंगा नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषित पाणी सोडू नये, या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांना सोबत घेऊन आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रोसेस उद्योगांमधून विनाप्रक्रिया सोडले जाणारे विषारी रासायनिक पाणी हे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनाच्या दबावामुळे काही काळ हे प्रदूषित पाणी नदीत येणे थांबले होते आणि त्यामुळे पंचगंगा काही प्रमाणात स्वच्छ झाली होती. मात्र नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करायची असेल तर हे रासायनिक पाणी पूर्णपणे रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी

दि. २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कोणतीही ठोस कृती करण्यात आली नाही, असा आरोप करत चुडमुंगे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांना प्रशासनाकडून अप्रत्यक्ष सहकार्य मिळत असल्याचे चित्र बैठकीत दिसून आले. त्यामुळे आता आरपारची लढाई उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार-आमदारांना निमंत्रण

५ जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘प्रोसेस’चे पाणी ओढ्यातच

शिरोळ तहसीलदार कार्यालयात २ जून रोजी झालेल्या बैठकीत १६५ एकर शेतीची पडताळणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार २२ जून रोजी झालेल्या पडताळणीत १०६ एकरांपैकी केवळ ३३ एकर शेती पाणी घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने ३३ एकर शेतीला पुरेल इतक्याच प्रोसेस सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र इचलकरंजीतील सर्व प्रोसेस पूर्ण क्षमतेने सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला.

प्रोसेसचे पाणी शेतीपेक्षा ओढ्यांमध्येच जास्त प्रमाणात सोडले जात असल्याचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अहवालातून स्पष्ट केले आहे. कोणताही शेतकरी हे प्रदूषित पाणी घेण्यास तयार नसताना कागदोपत्री शेती दाखवून प्रत्यक्षात ओढ्यात पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोपही चुडमुंगे यांनी केला.

इचलकरंजीच्या आमदारांवर टीका

इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे हे प्रदूषण करणाऱ्या प्रोसेस मालकांची बाजू घेत असल्याचा आरोप करत चुडमुंगे म्हणाले, “इचलकरंजीच्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आमदारांनी प्रोसेस चालकांना कायद्याने वागण्यास भाग पाडावे. आम्हाला शहाणपणा सांगण्यापेक्षा प्रदूषण रोखण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी.”

या पत्रकार परिषदेला दीपक पाटील, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, सर्जेराव बाबर, आप्पासो कदम, आयुब पट्टेकरी, पोपट राणे, संदीप चौगुले, बंटी माळी, जितेंद्र टाकळे, रशीद मुल्ला, संभाजी माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

जि.प. शाळा तांभा येथे शाळा प्रवेश महोत्सव उत्साहात संपन्न

Next Post

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत १२ विषयांना मंजुरी

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
7
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
28
Next Post

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत १२ विषयांना मंजुरी

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In