• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वळसंग-काराजनगी रस्त्याची दयनीय अवस्था; विद्यार्थ्यांना मोठा त्रास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पावसाळ्यात तातडीने दुरुस्ती करण्याची चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांची मागणी

जत / प्रतिनिधी : वळसंग ते काराजनगी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून शाळेसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने पावसाळ्यात तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजप नेते व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

श्री. कुंभार म्हणाले की, वळसंग ते काराजनगी या गावांदरम्यान सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतर असून या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वळसंग येथे ये-जा करतात. मात्र ऐन पावसाळ्यात पायी किंवा सायकलने प्रवास करताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी व समस्यांचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

वळसंग गावातून काराजनगीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून गावकऱ्यांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून या रस्त्याचे मुरमीकरण केले आहे. तरीही पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहनचालकांना दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा वाहने घसरून अपघातही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असून दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून काटेरी झुडपे मुळासकट काढावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खराब होत असल्याने प्रशासनाने या रस्त्याच्या कामास मंजुरी देऊन युद्धपातळीवर दुरुस्ती पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केले.

Tags: Arun Koli
Previous Post

नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण; वटपौर्णिमेनिमित्त शिक्षणातून अध्यात्माकडे अनोखा संदेश

Next Post

एकसळ–आंबिवली जोडरस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण; साईड पट्टीचे काम रखडल्याने अपघाताची भीती

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
59
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post

एकसळ–आंबिवली जोडरस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण; साईड पट्टीचे काम रखडल्याने अपघाताची भीती

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In