• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल मतदार पुनरीक्षण’ कार्यक्रमास प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

शहादा, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ०२ शहादा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे यांनी केले. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना दीपक गिरासे म्हणाले की, या विशेष पुनरीक्षण मोहिमेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. मोहिमेचा पहिला टप्पा २० जून २०२६ पासून सुरू झाला असून दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर संकलित माहितीच्या आधारे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या नोंदी तपासण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आवश्यक त्या प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटिसा बजावून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींवर सखोल छाननी करून ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये शहादा तालुक्यातील २२७ आणि तळोदा तालुक्यातील १३९ मतदान केंद्रांचा समावेश आहे. ही मोहीम प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत.

मोहिमेदरम्यान बीएलओ मतदारसंघातील प्रत्येक घराला किमान तीन वेळा भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे, अचूक पत्ता, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नवीन मतदार नोंदणी, मयत किंवा दुबार नावे वगळणे, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करणे आदी कामांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत शहादा व तळोदा तहसील प्रशासनाने युवक, महिला आणि सर्व मतदारांना या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

पदोन्नती प्रक्रिया स्थगितीबाबत शिक्षक कृती समितीचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न; सी.ए. चिन्मय सामुद्रेचा सत्कार

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न; सी.ए. चिन्मय सामुद्रेचा सत्कार

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In