• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न; सी.ए. चिन्मय सामुद्रेचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ३० : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल या होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक-पालक सभेचे संयोजक प्रा. डॉ. शिवनाथ पटेल यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा व नियोजनाची माहिती उपस्थित पालकांना दिली.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी चिन्मय विजय सामुद्रे याने सी.ए. परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पालकांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल म्हणाल्या की, “पालक सभा ही पालक, शिक्षक आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात सुसंवाद निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे सोपे होते.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या वाढत्या गळतीबाबत चिंता व्यक्त करत पालकांनी आपल्या पाल्याला नियमित महाविद्यालयात पाठवावे, असे आवाहन केले. शासनाने महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन उपस्थिती प्रणाली सुरू केल्याने विद्यार्थ्यांनी वेळेवर वर्गात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, ज्येष्ठ प्राध्यापक व्ही. सी. डोळे, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. डॉ. शिवनाथ पटेल, प्रा. सौ. भारती पाटील, प्रा. उदय पटेल, प्रा. सविता पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. चंद्रकांत पाटील यांनी मानले. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सभा यशस्वीपणे पार पडली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल मतदार पुनरीक्षण’ कार्यक्रमास प्रारंभ

Next Post

गडचिरोलीच्या आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

गडचिरोलीच्या आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In