• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये पाण्यात; फक्त पाइप गाडल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

विधानसभेत आमदार हेमंत ओगले आक्रमक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर मतदारसंघात जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक योजना केवळ कागदावर पूर्ण झाल्याचा आरोप आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत केला. “प्रत्यक्षात फक्त पाइप गाडण्याचे काम झाले असून एकही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे शासनाचे करोडो रुपये वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे,” असे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना आमदार ओगले यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत टीका केली. या योजनांमधील त्रुटींची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, श्रीरामपूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत ४३ योजना आणि राहुरी तालुक्यात १८ योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत ९ योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी पाण्याचा मुख्य स्रोत निश्चित न करता केवळ पाइपलाइन टाकण्याची घाई करण्यात आली.

यामुळे संबंधित कंत्राटदार आता वाढीव खर्चासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “जुनी कामे पूर्ण न करता नव्याने निधी मागण्याचा प्रकार गंभीर आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत १५ जुलै २०२६ रोजी या विषयावर विशेष बैठक पार पडली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.

जुनी अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारांना कोणतीही सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ नये, अशी ठाम मागणी आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत केली.

Previous Post

तालुका क्रीडा संकुलासाठी शेती महामंडळाची जमीन मंजूर; विविध विकासकामांना गती

Next Post

गेवराई तहसील कार्यालयात निराधारांची फरफट; अनुदान रखडल्याने लाभार्थी त्रस्त

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post

गेवराई तहसील कार्यालयात निराधारांची फरफट; अनुदान रखडल्याने लाभार्थी त्रस्त

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In