आज दिनांक 15/08/2026 रोजी भारताचा 80वा स्वतंत्र दिन पिंपळगाव कळमेश्वरी येथे अति उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम प्रभात फेरी विविध घोषणा देत काढण्यात आली व ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात करुन जि. प. प्रा.शाळा पिंपळगाव येथील ध्वजारोहण करण्यात आले नंतर कळमेश्वर विद्यालय येथील ध्वजारोहण संस्थेचे सचिव अड प्रविण रामकृष्ण जोगदंड यांच्या हास्ते करण्यात आले.मुलांचे क्रांतिकारकावर भाषणे व देशभक्तीपर गीत गायन सादर करण्यात आले.
या स्वतंत्रदिनाच्या कार्यक्रमात भाषणातून काफीमुक्त परीक्षा आसा विशेष संदेश देण्यात आला.यावेळेस सर्व ग्रामस्थ, पालक,शाळेचे मुख्याध्यापक श्री भैरट सर व शिक्षक स्टाप उपस्थित होता तसेच ब्रम्हगाव येथे देखील अति उत्साहात आज 80 वा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला .शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली या वेळेस गावातील लहान थोर मंडळी व ब्रम्हगाव पारधी वस्तीवरील वस्ती शाळेच्या शिक्षीका माया आहिरे,शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व पाहाडे सर हाजर होते.









