• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

चांदूर रेल्वेत सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदूर रेल्वे, दि. ११ ऑगस्ट २०२६ :
आपले सर्वांचे लाडके नेतृत्व मा. आ. प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच नगरसेविका ॲड. कीर्तीताई राहुल इमले आणि नगरसेवक तथा गटनेता मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त चांदूर रेल्वे शहरात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे येथे रुग्णांना फळवाटप करून करण्यात आली. त्यानंतर यशवंत लॉन्स, चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या शैक्षणिक यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच न. प. हुतात्मा स्मारक अभ्यासिका येथील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक भेट वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. प्रभाकरराव वाघ सर आणि हर्षल वाघ प्रास्ताविक सतपाल वरठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, मेहनत, सातत्य आणि जिद्द यांचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती राजेंद्रजी राजनेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दिनेश जी ठाकरे, माजी सभापती गणेश जी आरेकर, अमोल भाऊ होले, शिट्टु दादा सूर्यवंशी, ॲड. कीर्तीताई इमले, अरिहंत गेडाम, निलोफर शेख, माजी नगराध्यक्ष अंजलीताई अग्रवाल, प्रियांकाताई वरठे, पूनमताई कोकाटे, कल्पनाताई लांजेवार तसेच यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत देशमुख यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून शहरातील युवा पिढी सक्षम व्हावी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांची सकारात्मक भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अशा उपक्रमांची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिक पद्धतीने न साजरा करता रुग्णसेवा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षकांचा गौरव आणि विद्यार्थ्यांना पुस्तक भेट अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्राप्रती असलेली सकारात्मक भूमिका अधोरेखित झाली.

मा. आ. वीरेंद्रभाऊ जगताप मित्र परिवार, चांदूर रेल्वे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी कौतुक केले.

Previous Post

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

Next Post

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
10
Next Post
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In