• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गेवराई तहसील कार्यालयात निराधारांची फरफट; अनुदान रखडल्याने लाभार्थी त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

गेवराई (प्रतिनिधी) : शासनाकडून निराधार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र गेवराई तहसील कार्यालयात पाहायला मिळत आहे.

निराधार लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून रखडले असून केवायसी, हयात प्रमाणपत्र आणि आधार अपडेट आदी कारणांमुळे लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

वयाची ८० ते ९० वर्षे ओलांडलेले अनेक वृद्ध नागरिक आपल्या हक्काच्या तुटपुंज्या मानधनासाठी तहसील कार्यालयात रोज हेलपाटे मारताना दिसत आहेत. शरीर साथ देत नसतानाही कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी त्यांना दूरवरून कार्यालयात यावे लागत आहे.

“या वयात आधार अपडेट करण्यासाठी जाणे, ठसे देणे, डोळ्यांचे स्कॅन करणे खूप कठीण जाते. हात थरथरतात, चालणे जमत नाही; तरीही मानधनासाठी कार्यालयात यावे लागते,” अशी व्यथा अनेक वृद्ध लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

गेवराई तालुक्यात संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अंतर्गत मोठ्या संख्येने वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थी आहेत. या योजनांमधून मिळणारे मानधन हे अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरत आहे.

मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने लाभार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने रखडलेले अनुदान वितरित करावे आणि वृद्ध व निराधार नागरिकांची होणारी फरफट थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Datta Giri
Previous Post

जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये पाण्यात; फक्त पाइप गाडल्याचा आरोप

Next Post

काकडवाडीत बिबट्याचा युवकावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

काकडवाडीत बिबट्याचा युवकावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In