• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
0
SHARES
70
VIEWS
Ad 1

चांदूर रेल्वे, जि. अमरावती : राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटने शिस्तबद्ध व आकर्षक संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. प्रा. यू. व्ही. जगताप होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर, मुख्याध्यापक श्री. प्रदीप तळोकार, श्री. कुणाल सिंगलवार, सौ. वर्षा भगत तसेच सी.टी.ओ./एनसीसी अधिकारी डॉ. एस. एस. पाडेन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अस्लम एन. खान यांनी जबाबदारी पार पाडली.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ‘संकल्प’ या महाविद्यालयीन नियतकालिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नियतकालिकाच्या संपादक मंडळात डॉ. ए. डी. बानसोड, डॉ. संपदा पी. पाथरकर, श्री. के. के. सोळंके आणि श्री. पी. डब्लू. चव्हाण यांचा समावेश आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. बी. संतापे आणि डॉ. आर. एन. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी महाविद्यालयातील गुणवंत व अव्वल क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. देशभक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव अशा विविध उपक्रमांमुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Previous Post

वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

Next Post

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
10
Next Post
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In