• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काकडवाडीत बिबट्याचा युवकावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात अर्जुन शिरसाठ हा युवक जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, मानवी हल्ल्याच्या या पहिल्याच घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काकडवाडी येथील मुळे वस्तीवरील शांताराम मुळे यांच्या घराजवळील शेतातील गवताळ कोरड्या भागात बिबट्या दबा धरून बसला होता. अर्जुन शिरसाठ हा युवक मोटारसायकलवरून जात असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या हल्ल्यात अर्जुन शिरसाठ यांच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे उमटले असून ते थोडक्यात बचावले. जखमी युवकाला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

काकडवाडी परिसरात यापूर्वी बिबट्याकडून शेळ्या, गाई आणि इतर पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, मानवावर झालेल्या या पहिल्याच हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर वनविभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच जखमी युवकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागाने उचलावा, अशी मागणीही पुढे आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी चारा कापताना, शेतात काम करताना तसेच प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केले आहे.

Tags: Surendra Gadve
Previous Post

गेवराई तहसील कार्यालयात निराधारांची फरफट; अनुदान रखडल्याने लाभार्थी त्रस्त

Next Post

सरण आंदोलनाला यश; भगूर–पांढुर्ली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post

सरण आंदोलनाला यश; भगूर–पांढुर्ली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In